Posts

Showing posts from 2020

Pages of a Diary - एकटा जीव सदाशिव

  परवा, मी नेहमीच्या एका कॅफे मध्ये नेहमीच्या जागेवर एकटी काम करत बसले होते. गुरुवार असूनही कॅफे ची टेबलं तशी भरलेली होती. मी मात्र, कानात earphones घालून, पुस्तकात तोंड खुपसून काहीतरी लिहीत बसलेले. हळूच आजूबाजूला नजर टाकली तर लक्षात आलं कि प्रत्येक जण कोणा- न- कोणाबरोबर आलेला होता; माझ्या शिवाय.  मित्र- मैत्रिणी, प्रियकर, सहकारी, वगैरे. प्रत्येकाची  अद्वितीय परिस्थिती, आणि त्यावरून रंगलेल्या संदिग्ध गप्पा.     मी पुन्हा एकदा पुस्तकात डोकं खुपसलं, पण मन सारखं विचलित होत असल्याने जरा वेळ विश्रांती घ्यायचं ठरवलं. earphones ची बुचं कानातून काढली आणि एक सुस्कारी सोडली. पुस्तक बंद करून बाजूला ठेवलं. शेवटचा पानाची खूण न करता पान बंद केलं आणि ते लक्षात आल्यावर जोरात 'हट्ट यार' असा उद्गार व्यक्त केला. कॅफे मधल्या सगळ्या नजरा आता माझ्याकडे वळल्या आहेत हे बघून परत स्वतःला चार नावं ठेवली; ह्या वेळी, मनातल्या मनात. मग, एव्हाना थंडची गरम झालेली iced कॉफी पीत निवांत बसले.       लहान पणा पासून स्वभाव भिडस्त असल्याने एकट्याने फिरायचा कधीच कंटाळा यायच...