Pages of a Diary - एकटा जीव सदाशिव

 परवा, मी नेहमीच्या एका कॅफे मध्ये नेहमीच्या जागेवर एकटी काम करत बसले होते. गुरुवार असूनही कॅफे ची टेबलं तशी भरलेली होती. मी मात्र, कानात earphones घालून, पुस्तकात तोंड खुपसून काहीतरी लिहीत बसलेले. हळूच आजूबाजूला नजर टाकली तर लक्षात आलं कि प्रत्येक जण कोणा- न- कोणाबरोबर आलेला होता; माझ्या शिवाय. 
मित्र- मैत्रिणी, प्रियकर, सहकारी, वगैरे. प्रत्येकाची  अद्वितीय परिस्थिती, आणि त्यावरून रंगलेल्या संदिग्ध गप्पा.
    मी पुन्हा एकदा पुस्तकात डोकं खुपसलं, पण मन सारखं विचलित होत असल्याने जरा वेळ विश्रांती घ्यायचं ठरवलं. earphones ची बुचं कानातून काढली आणि एक सुस्कारी सोडली. पुस्तक बंद करून बाजूला ठेवलं. शेवटचा पानाची खूण न करता पान बंद केलं आणि ते लक्षात आल्यावर जोरात 'हट्ट यार' असा उद्गार व्यक्त केला. कॅफे मधल्या सगळ्या नजरा आता माझ्याकडे वळल्या आहेत हे बघून परत स्वतःला चार नावं ठेवली; ह्या वेळी, मनातल्या मनात. मग, एव्हाना थंडची गरम झालेली iced कॉफी पीत निवांत बसले. 
     लहान पणा पासून स्वभाव भिडस्त असल्याने एकट्याने फिरायचा कधीच कंटाळा यायचा नाही. कधी कोणाकडे दुःख व्यक्त करायची इच्छा झाली नाही, तर आनंदाचा उत्सव करायची गरज भासली नाही. 'एकटा जीव सदाशिव' ही वृत्ती आपली मानून मी समाधानी जगत राहिले. पण, सभोवतालच्या चर्चेतून भिन्न विषय कानाला आढळत होते. 
      माणूस जातीची बहिर्मुखी वृत्ती पाहून मला नेहमीच कुतुहल वाटत आले आहे. कारण त्याच जातीची असूनही त्या गुणांचा माझ्यात बराच आभाव आहे. त्या मुळे, या कुतूहलाचे अन्वेषण करायचे मी ठरवले. माझ्या समोरच्या टेबलावर मित्र-मैत्रिणींचा एक गट बसलेला. नुसत्या गप्पा गोष्टी आणि दंगा सुरु होता. प्रत्येकाला काहीतरी वेगळं बोलायचं होत पण भेळे सारखे ते सगळे स्वतंत्र उमेदवार एकत्र मिसळलेले आणि गोगांटचा एक chorus ऐकू येत होता. त्यांची प्रश्नपत्रिकेतील उत्तरांवर गहन चर्चा सुरु होती. त्यातील एक मुलगा चांगलाच घाबरलेला. 'मी फक्त २० मार्कांचा पेपर लिहिलाय यार आन्या आणि आता बाबा मला दुकानावर बसवतील' असे काही भाव व्यक्त करीत होता. प्रत्येक जण आप आपला त्या परीक्षेचा अनुभव व्यक्त करीत होते. कोणाला पेपर 'एक नंबर' गेलेला तर कोणीतरी 'काठावर पास' होतं असा दावा सुरु होता. 
       त्या गप्पांच्या मैफिलीत हरवून गेलेले असताना कधी ती कॉफी संपली कळलं सुद्धा न्हवतं. नुसताच straw तोंडात दाबून मी माझा विचारांमध्ये हरवलेले. या गप्पा ऐकून मला माझा कॉलेज चं पहिलं वर्ष आठवलं. पुण्याचा टिळक रोड ला असलेल्या स.प. कॉलेज मधून, जिकडे पार्टी ची पोहोच हि कॅन्टीन मधल्या सामोसा पाव पर्यंत होती, तिथून थेट मला सिंबायोसिस सारख्या international विद्यालयात प्रवेश मिळाला होता. आणि आता तास संपला, कि २० रुपयाची filter कॉफी नाही तर २०० रुपयाचा Keventers चा milkshake पिणं या बदलाशी जुळवून घेणं मला थोडं अवघड जात होत. आयुष्य हे पुण्याच्या पेठा आणि कोथरूड परिसरात गेल्या मुळे इतर विद्यार्थ्यांशी हिंदी मध्ये बोलायची थोडी लाज वाटत होती. पण हा बदल पचवणं अवघड जातंय हे सांगणार कोणाला? अंतर्मुख स्वभावाच्या 'आदत से मजबूर' असून मी काही न बोलता ती भावना मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात लॉक करून टाकलेली. आणि याचा दुष्परिणाम मला पहिल्या वर्षाचा निकाल लागल्यावरच लक्षात आला. अचानक समोरच्या टेबलावरची पोरं पोरी जोरात ओरडली आणि मी माझा दिवास्वप्नातुन वास्तव्यात परतले. 
           त्या गटात आता अजून एका मैत्रिणीची भर झालेली. ती सगळ्यांना रडत रडत सांगत तिची ३ विषयात नापास झाल्याची निराशा व्यक्त करत होती. भूगोल जमत नाही म्हणून स्वतःला आणि विषयाला कोसत बसलेली. इतक्यात त्यातील एका मुली ने एक योजना काढली; study group ची. आणि तिच्याच शब्दात सांगायचं झालं तर 'मला गणित झेपत नाही, तू मला integration शिकव आणि मी तुझ्याकडुन भूगोलाचे पाठांतर करून घेते.' सगळ्यांचे चेहरे पुन्हा चमकले आणि एक मेकांना टाळ्या देत आणि मिठी मारत ते सर्व जण तिकडून गायब झाले. 
      मी पुनः एकदा आजूबाजूला नजर फिरवली, भिन्न विषय पुन्हा कानावर पडू लागले. मग, सोबत कोणी नसल्याने, मी स्वतःशीच संवाद साधू लागले. कॉलेज च्या पहिल्या वर्षी जरी मी एकलकोंडी असले, तरी नंतर झालेच की पास. हा थोडा त्रास झाला, थोडा नाही, चांगलाच त्रास झाला, पण शेवटी काय, झाले पास. मग कशाला करायच्या भावना व्यक्त? पण मग जरा विचार केला. केल्या असत्या भावना व्यक्त तर? मागितली असती थोडी मदद, तर कदाचित सुरुवातीला विचित्र वाटलं असतं, पण मनावरचा भार हलका झाला असता. आपण ह्या लढाईत एकटे नाही, हे आश्वासन मिळालं असत. मग, मला माझा लोकांच्या बहिर्मुखी स्वभावा बद्दलच्या कोड्याचं उत्तर मिळालं. माणूस हा स्वयंपूर्ण असतोच, आणि कोणत्याही संकटाला सामोरी जाण्याची ताकद त्यात असते किंवा निर्माण होऊ शकते. पण, त्या शक्ती चा निर्माणाला चालना या भावना देतात. कोणाकडून तरी प्रोत्साहन मिळाले कि लढायची उमेद वाढते. 
       हि उमेद मिळायला सोबत गरजेची असते, आणि सोबत असायला संवाद. हे असं म्हणून मी पुन्हा एकदा सुस्कारी सोडली आणि earphones ची बुचं कानाला लावून पुस्ताकात तोंड खुपसलं. काय करणार, 'आदत से मजबूर' , नाहीका?

-Brown and Indian
        
        

Comments

  1. तुझे हे नवीन स्फुट लेखन मातृभाषेतून लिहल्याचा मला जास्त आनंद झाला. काही मराठी शब्द तू अगदी चपखलपणे वापरले आहेस. उदाहरणार्थ "अन्वेषण" हा शब्द. काही शब्द मात्र चुकीच्या पद्धतीने लिहले आहेत. होईल, पुढील लेखनात सुधारणा नक्कीच होईल.

    आता तुझ्या लेखातून व्यक्त झालेल्या भावनांविषयी -
    तुझ्या भावना इतरांना जाणवतील,अशा प्रभावशाली पध्दतीने लिहिल्या गेल्या आहेत. आपण जसे आहोत तसेच छान आहोत ह्यावर तुझा ठाम विश्वास जाणवतो व तो चांगलाच आहे.
    अंर्तमुख असणे हा दोष नक्कीच नाही. परंतु, अंर्तमुख असणे व सतत नकारात्मक विचारांच्या प्रभावाखाली असणे यामध्ये उत्तम समन्वय व समतोल साधणे मात्र जरूरीचे आहे. त्यासाठी एकतरी मैत्रीण अथवा मित्र (जवळाची/जवळचा) असावा म्हणजे आपली वाटचाल अजून सुकर होईल.

    असेच छान छान लिहीत रहा.

    - मिलिंदकाका

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

The Eyes That Changed My Life

Escaping The Tornado

Vaidya Ajoba